न्हावरे येथे ऊसतोड मजुराची गळफास घेवून आत्महत्या
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे ऊसतोड मजुराने गळफास घेवून आत्महत्या केव्याची घटना घडली.
सुभाष सदाशिव गायकवाड वय ३५ रा.गोखेल ता.आष्टी जि.बीड असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे.
१ नोव्हेंबरला न्हावरे येथील शाळेच्या पाठीमागील शेतात अज्ञात इसमाचा झाडाला गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलीसांना दिली होती.
काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात ऊसतोड मजूर बेपत्ता घटनेची फिर्याद विठ्ठल गायकवाड यांच्याकडून दाखल करण्यात आली होती.
न्हावरे येथे ऊस तोडणी मजुराचे नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपीनाथ चव्हाण या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.