निमगाव म्हाळुंगी गावच्या उपसरपंचपदी कु.प्रदीप पवार
शिरूर:- शिरूर तालुक्याच्या निमगाव म्हाळुंगी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कु.प्रदीप गोरख पवार यांची बिनविरोध निवड झाली.
निमगाव म्हाळुंगी गावचे आदर्श सरपंच बापूसाहेब काळे यांनी ही माहिती दिली.
नामनिर्देशन अर्ज स्विकृती दि.२२/०१/२०२५ रोजी ११ ते १२ यावेळेत निश्चित करण्यात आली होती.
सदर विहीत वेळेत कु.प्रदीप गोरख पवार यांचे उपसरपंच पदासाठी सकाळी ११.२५ वाजता एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले. नामनिर्देशन पत्र छाननी वेळ दुपारी १२ ते १ विहीत करण्यात आली होती.नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची वेळ दुपारी १ ते २ विहीत करण्यात आली होती.विहीत वेळेत कु.प्रदीप पवार यांनी नामनिर्देशन पत्र माघारी न घेतल्याने त्यांची निमगाव म्हाळुंगी गावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली.निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, मनसे शिरूर तालुकाध्यक्ष तेजस यादव, आजी,माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.