निमगाव म्हाळुंगीत ग्रामस्वछता अभियान आणि मातृ-पितृ पूजन
शिरूर :- निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव म्हाळुंगी गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजता दिलीपराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शिवराज पवार,भूषण दौंडकर,आर्यन चव्हाण,युवराज चव्हाण,शौर्य दोरगे,आदित्य धोत्रे, गणेश चव्हाण, आदित्य कुटे,प्रथमेश कुटे,कृष्णा शिंदे हर्षल धोत्रे,राजकुमार कांबळे, प्रेम लोखंडे, अपूर्वा दौंडकर,या सर्व तरुणांनी गावातील मुख्य बाजार पेठ व गावातील सर्व मंदिरे झाडून आणि पाण्याने स्वच्छ धुवून काढली. सायंकाळी सात वाजता भारतीय संस्कृती रक्षक सेना आणि योग वेदांत सेवा समिती यांच्या माध्यमातून संतोष गायकवाड, राधा नागोसे, पुंडलिक नागोसे आणि उमेश खोपडे
यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ५१ माता पित्यांचे पूजन मुलामुलींच्या हस्ते करण्यात आले. आई - वडिलांना आयुष्यात कधीही विसरता कामा नये, आई-वडिलांचा मान सन्मान करावा, आई-वडिलांची रोज दैनंदिन पाया पडून पूजा केली पाहिजे आणि आपल्या आई-वडिलांना आयुष्यात कधीही वृद्धाश्रमात पाठवू नये असे संस्काररूपी विचार मातृ -पितृ पुजनाच्या कार्यक्रमात सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते राहुल करपे, पत्रकार निलेश जगताप यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. हभप ईश्वर महाराज डुबे,बाबुराव चौधरी नामदेव काळे, बाबा नागवडे, दत्तात्रय नागवडे,मनोहर चव्हाण, कुणाल काळे यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. हभप ईश्वर महाराज डुबे यांचे समाजप्रबोधन पर भारूडाचे आयोजन करण्यात आलेले असून निमगाव म्हाळुंगीतील महिलांसाठी मोफत माता एकविरा आई दर्शन यात्रेचेही आयोजन करण्यात आल्याचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयंत पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे यांनी सरपंच बापूसाहेब काळे यांनाअखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे जिल्हा अध्यक्षपद निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले यावेळी प्रसिद्ध निवेदक आणि सूर्यदत्ता ग्रुप चे प्रा.डॉ सुनील धनगर,हभप ईश्वर महाराज डुबे,दिलीप चव्हाण, बाबुराव चौधरी, विक्रम साकोरे आदी उपस्थित होते.