निमगाव महाळुंगी ता.शिरूर येथे ज्वारी शेतीशाळा संपन्न
Raju Tapal
January 17, 2022
42
निमगाव महाळुंगी ता.शिरूर येथे ज्वारी शेतीशाळा संपन्न
महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ज्वारी शेतीशाळा घेण्यात आली. शेतीशाळे मध्ये पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन तसेच मित्र किडीची ओळख याविषयी सविस्तर मार्गदर्शन मास्टर ट्रेनर कृषी सहाय्यक अशोकराव जाधव यांच्यामार्फत करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीशाळेची कीट व हरभरा घाटे आळी साठी फेरोमोन ट्रॅप चे वाटप करण्यात आले.
शेतीशाळा मध्ये प्रक्षेत्र शिवारफेरी करून विविध किडी गोळा करून त्यांच्या नियंत्रणाचे उपाय शेतकऱ्यांना सांगितले व हरभरा वरील घाटे आळी नियंत्रणाचे उपाय प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले व शेतामध्ये फेरोमोन ट्रॅप चे महत्व सांगितले.
निमगाव म्हाळुंगी कृषी सहाय्यक जयश्री रासकर यांनी शेतीशाळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते भागवत वस्ती येथील प्रगतशील शेतकरी दीपक भागवत यांच्या शेतावर कार्यक्रम घेण्यात आला. परिसरातील शेतकरी दत्तात्रय भागवत ,वैभव भागवत, शरद गवते, भाऊसाहेब गवते व महिला शेतकरी सविता भागवत, वैशाली भागवत, शोभा भागवत, उर्मिला गवते, जयश्री भागवत, सुनीता भागवत असे बहुसंख्येने शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.
कृषीसहाय्यक जयश्री रासकर यांनी आभार मानले.
Share This