• Total Visitor ( 133100 )

'बोल राधा बोल', 'लाडला','दस', 'रेडी' चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचं निधन

Raju Tapal December 29, 2022 51

'बोल राधा बोल', 'लाडला','दस', 'रेडी' चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचं निधन

हिंदी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांचे आज दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच नितिन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचारात प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही दिवस त्यांना व्हेटिंलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांचे निधन झाल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

निर्माते नितिन मनमोहन यांना ३ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे शेवटचे काही दिवस त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच नितिन मनमोहन यांची मुलगी प्राची हीने ईटी टाइम्सशी बोलताना सांगितले की, “माझ्या वडीलांची प्रकृती ठिक नसून ते शुद्धीवर आलेले नाहीत.”

नितिन मनमोहन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन यांचे सुपुत्र होते. त्यांनी सिनेसृष्टीतील करिअरमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. बोल राधा बोल, लाडला, दस यासारखे काही सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. सलमान खानच्या प्रसिद्ध अशा रेडी चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनीच केली होती.

Share This

titwala-news

Advertisement