निवडणुका आल्या की कोटीच्या निधीचे बॅनर लागतात,मात्र कोटी गेले कुठे, रस्ते कुठे आहेत - मनसे आमदार राजू पाटील यांची टीका
कल्याण डोंबिवली मधील विविध समस्यांबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली . यावेळी आयुक्तांसमोर रस्ते व पाण्याबाबतच्या समस्या मांडत सूचना केल्या .या बैठकीनंतर नंतर पत्रकारांशी बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं , निवडणुका आल्या की बॅनर लागतात ,111 कोटी आले 437 कोटी आले ,हे कोटी गेले कुठे रस्ते कुठे आहेत असा सवाल केला . एम आय डी सी भागात जे रस्ते बनवले जाणार आहेत त्याचे काही महिन्यांपूर्वी बॅनर लावले मात्र आता बॅनर फाटायची वेळ आली तरी अजून या कामाचं टेंडरिंग झाली नसल्याची टीका नाव घेता शिवसेनेवर केली .खड्डे भरण्याची तरतूद वाढवावी अशी आयुक्तांकडे मागणी केली असून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले.