• Total Visitor ( 133500 )

बुलढाण्यातील त्या नवजात बाळाच्या पोटात एक नव्हे तर दोन मृत अर्भके

Raju tapal February 05, 2025 33

बुलढाण्यातील त्या नवजात बाळाच्या पोटात एक नव्हे तर दोन मृत अर्भके
डाँक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून काढली दोन मृत अर्भके;
डाँक्टरांची कौतुकास्पद कामगिरी 

अमरावती :- बुलढाण्यामध्ये बाळाच्या पोटात बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती. या दुर्मिळ घटनेतील महिलेची नुकताच सुरक्षित प्रसुती करण्यात आली. बुलडाणा जिल्हा महिला रुग्णालयात शस्त्रक्रिया करून महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली. त्यानंतर या बाळाला आणि आईला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आले होते. याठिकाणी नवजात बाळाच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आले. या बाळाच्या पोटामध्ये एक नव्हे तर दोन मृत अर्भक होते ते यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डाँक्टरांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील त्या नवजात ३ दिवसांच्या बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या नवजात बाळाच्या पोटात एक नाही तर दोन मृत अर्भक निघाले. दोन्ही अर्भक तीन इंचाचे होते. त्या नवजात बाळाच्या पोटात दोन्ही अर्भकाचे शरीर तयार झाले होते. ५ डॉक्टर, ४ नर्स आणि इतर कर्मचारी यासह १२ जणांनी या नवजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. बाळाच्या पोटाला १२ टाके पडले. शस्त्रकियेनंतर नवजात बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. एका पुरुष जातीच्या नवजात पोटातून २ अर्भक निघणे ही देशात आतापर्यंतची ही पहिलीच घटना आहे. या बाळावर शस्त्रक्रिया करणं हे डॉक्टरांसमोर मोठं चॅलेंज होतं. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.

बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली होती. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत 200 तर देशात मोजक्याच अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात एक 32 वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. ही महिला 32 आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे. डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून पुनर तपासणी करून निश्चित केलं. दरम्यान, महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला "फिटस इन फिटू" असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत,  त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement