• Total Visitor ( 133766 )

आता मोर्चा अनधिकृत आरसीसी इमारतीच्या बांधकामांकडे

Raju tapal February 21, 2025 78

आता मोर्चा अनधिकृत आरसीसी इमारतीच्या बांधकामांकडे ..... !
तब्बल ५ वर्षांनी केला एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल...! 

अटाळीत अनधिकृत आरसीसीस इमारत बांधकाम प्रकरणी अ प्रभाग सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी केला एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल
सन २०२० ला दिली होती तत्कालीन अधिकाऱ्यांनी नोटीस तर २०२५ साली गुन्हा दाखल..?

राजू टपाल. 
टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनधिकृत चाळींच्या बांधकामांवर चांगलाच हल्ला बोल करीत सध्यस्थितीत उभ्या असलेल्या शेकडो चाळी भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच त्यांनी आता अ  प्रभागात सुरु असलेल्या अनधिकृत आरसीसी इमारतींकडे मोर्चा वळवला असून लवकरच त्याही भुईसपाट करण्याचा त्यांचा मानस असून त्याबाबतची पावले त्यांनी उचलण्याचे सुरु केले असून अटाळीतील एका बांधकामावर एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल केला असून अन्य एक जणाला ४७८ अन्व्ये नोटीस देण्यात आलेली आहे. 
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, मौजे अटाळी येथील सर्व्हे नंबर १, हिस्सा नंबर १ /अ क्षेत्रापैकी १० आर ८ प्रति या भुखंडावर बांधकामधारक भगवान दत्तू पाटील व जमीनमालक देवराम दत्तू पाटील व विकासक विद्याधर आत्माराम आयरे आरसीसी इमारतीचे बांधकाम केले असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधीत बांधकाम धारकांना सदर बांधकामाची अधिकृतता सिद्ध करणारे कागदपत्र संबधीत तत्कालीन प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमाचे कलम २६० व महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम कलम ५२,५३ अन्वये दिनांक १७/०६/२०२० रोजी नोटीस बजावून सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु सादर सुनावणीस उक्त बांधकाम धारक उपस्थित राहिले नाहीत तसेच सदरील बांधकामांची अधिकृतता सिद्ध करणारी कोणतेही दस्तऐवज सादर केलेली नव्हती परिणामी तत्कालीन प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६० ( २ ) व ( ४७८ अन्व्ये दिनांक २/०३/२०२१ रोजी बांधकाम अनधिकृत घोषित केली होती तसेच जमीनमालक,विकासक आणि एकूण १२ रूममालक / भाडेकरू यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६८(१) (अ ) अन्वये दिनांक ९/१०/२०२४ रोजी ३० दिवसांच्या आत आपण राहत असलेली सदनिका रिकामी करून देण्यात यावी याबाबत नोटीस देण्यात अली होती मात्र संबंधित बांधकाम धारक भगवान दत्तू पाटील व देवराम दत्तू पाटील ( जमीन मालक तसेच विकासक विध्याधर आत्माराम आयरे यांनी मौजे अटाळी येथे अनधिकृत बांधकाम केले असल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६० व २६७ (१) चे नोटिसीचे अनुपालन करण्यास कसुरी केली म्हणून कलम ३९७ (अ) नुसार एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            
आणखी एक अनधिकृत बांधकाम व्यवसायिक रडारवर......  
दरम्यान अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी अटाळीतील शंकर भोईर कंपाउंड येथे अनधिकृत आरसीसी इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी आणखी एका विकासकाला ४७८ अन्वये नोटीस जारी केली असून त्याच्यावरही एमआरटीपी नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

Share This

titwala-news

Advertisement