ऑइल घेवून जाणारा टँकर चंदननगर येथे उलटला
ऑईल घेवून जाणारा टँकर दुभाजकाला धडकून पलटी झाल्याची घटना पुणे नगर महामार्गावर चंदननगर येथे रात्री १ वाजता घडली.
रात्रीपासून टँकरमधून ऑईल गळती सुरू असून ऑईल रस्त्यावर पसरले आहे.
रात्री पाऊस सुरू होता. रस्त्यावर अंधार होता. वाहतूक कोंडीतून सुटल्यानंतर चंदननगर येथे एका ट्रॅव्हलचालकाने अचानक रस्त्यामध्ये बस आणली. अरूंद रस्ता असल्यामुळे टँकर दुभाजकाला धडकला असे चालक मनीष गोड यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शी नरेश काळे व सहका-यांनी ड्रायव्हर व त्याच्या मदतनिसाला सुखरूप बाहेर काढले.
नगर रस्त्यावरची वाहतूक बी आर टी मार्गातून वळविण्यात आली.