पावणेपाच कोटींच्या कोकेनसह डोंगरीतून एकाला अटक!
Raju tapal
December 18, 2024
8
पावणेपाच कोटींच्या कोकेनसह डोंगरीतून एकाला अटक!
मुंबई - सुमारे एक किलो कोकेनसह ४५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात डोंगरी पोलिसांना यश आले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत पावणेपाच कोटी रुपये आहे. आरोपीविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगरी पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरी परिसरात गस्त घालत असताना एक संशयीत दुचाकीस्वार त्यांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडला. तपासणी ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून ९४० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत चार कोटी ७० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचे नाव इम्रान याकुब शेख ऊर्फ जुम्मा असून तो डोंगरी सिद्दी मोहल्ला येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सुमारे एक किलो कोकेनसह ४५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात डोंगरी पोलिसांना यश आले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत पावणेपाच कोटी रुपये आहे. आरोपीविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share This