कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; सणसवाडी येथील घटना
शिरूर :- कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे पुणे - अहिल्यानगर महामार्गावर घडली.
गणेश साठे वय - ४३ रा.पाटीलवस्ती, सणसवाडी ता.शिरूर असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून हाॅटेल चंद्रमा समोर हा अपघात झाला.
गणेश साठे हे सणसवाडी येथील हाॅटेल चंद्रमा समोरून पुणे - अहिल्यानगर रस्ता ओलांडत असताना अहिल्या नगर बाजूने पुण्याच्या दिशेने जात असलेल्या एम एच १४ एल यू ५१८९ भरधाव वेगातील कारची गणेश साठे यांना जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला.
अपघातात गंभीर जखमी झाल्याने गणेश साठे यांचा मृत्यू झाला.
बापू रामभाऊ साठे यांनी या अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिली.
सचिन कमलाकर चक्रनारायण रा.डांगेचौक, थेरगाव, पुणे या कारचालकाविरोधात शिक्रापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार रविकिरण जाधव या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )