• Total Visitor ( 370011 )
News photo

शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी ओळखपत्र कॅम्पचे आयोजन 

Raju tapal March 05, 2025 86

शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी ओळखपत्र कॅम्पचे आयोजन 



शिरूर:- 

 अँग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र ( Farmer Id ) काढण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय शिक्रापूर येथे दि.४ मार्च २०२५ रोजी मोफत कॅम्पचे आयोजन करण्यात आले  होते. शिक्रापूर गावचे सरपंच  रमेश गडदे माजी उपसरपंच  सुभाष खैरे,. सारिका सासवडे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे , ग्राम महसूल अधिकारी सुशीला गायकवाड कृषि सहाय्यक अशोक जाधव ,CSC धारक अमोल पांडे व मोहन भुजबळ, ए एस एन. कम्प्युटर्स चे संतोष काळे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी ५० ते ६० लोकांनी फार्मर आयडी तयार करून घेतल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी " टिटवाळा न्यूजला" सांगितले.

 राहिलेल्या इतर शेतकऱ्यांनी दोन दिवसात आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावे असे आवाहन शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे‌ यांनी केले आहे.

प्रतिनिधी:- विजय ढमढेरे शिरूर जि‌.पुणे

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement