ऊस उत्पादक शेतक-यांच्या बैठकीचे तळेगाव ढमढेरे येथे आयोजन
शिरूर :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात ऊस उत्पादक शेतक-यांच्या बैठकीचे आयोजन दि.२० जानेवारीला सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी "टिटवाळा न्यूज" ला दिली.
ऊसाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे त्यामानाने ऊसदर वाढ होत नाही. इतर ठिकाणच्या कारखान्यांपेक्षा आपल्या परिसरातील साखर कारखानदार खूपच कमी बाजार देत आहेत.शिरूर तालुक्याची कामधेनु घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे त्यामुळे इतर कारखान्यांच्या टोळ्या मिळविण्यासाठी ऊसतोडणी साठी करावी लागणारी कसरत अशा अनेक विषयांवर सवैधानिक मार्गाने आवाज उठविण्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे असे शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी "टिटवाळा न्यूज"ला सांगितले. ऊस उत्पादक शेतक-यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहनही राजेंद्र ढमढेरे यांनी केले आहे.