• Total Visitor ( 133683 )

केडीएमसीच्या वतीने दिव्यांगासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन

Raju tapal March 02, 2025 17

केडीएमसीच्या वतीने दिव्यांगासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने दिव्यागन साठी क्रिडा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

1माचै रोजी क्रिडा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली

महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांना एका प्रवाहा मध्ये आणण्यासाठी सवैक्षण सुरू आहे, तसेच वषैभर विविध उपक्रम राबविले जातात असे सांगितले,
क्रिंडा महोत्सवात गोळा फेक,व्हीलचेअर शयैत,कँरम,बुध्दीबळ, नेमबाजी, धावणे,बादलीत बाँल टाकणे,ईत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या, तीनशे दिव्यांग खेळाडूंनी सहभागी झाले होते,
बुध्दीबळ स्पर्धाचा शुभारंभ उपायुक्त धनजंय थोरात यांनी केले तर कँरम स्पर्धा शुभारंभ उपायुक्त संजय जाधव व समाज विकास अधिकारी प्रकाश गवाणकर यांनी  केले,
अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी सांगितले की  दिव्यांग बांधवान साठी महापालिका प्रशासन नेहमीच सहकार्य करीत असते,क्रिंडा महोत्सव भरवून दिव्यांग खेळयाची संधी उपलब्ध करुन दिली आहे, महापालिका प्रशासना कडून खास दिव्यांग साठी मोफत थेरपी सेंटर सुरू केले आहे, तसेच जवळपास चार हजार दिव्यागना अडीच हजार रुपये पेन्सेन देत आहे, तसेच दिव्यांग विवाह साठी एक लाख रुपये ,व व्यावसाय साठी दोन लाख रुपये दिले जातात म्हणजे याचा उद्देश दिव्यांग बांधव संक्षम झाला पाहिजे असे सांगितले,
यावेळी अपंग विकास महासंघाचे सवै सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली, तसेच आशा इंटरप्राईजचे अमोल कुळकर्णी व तनमय गायकर यांनी सहकार्य केले, 2माचै रोजी अत्रे सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे,
 

Share This

titwala-news

Advertisement