“जागतिक एड्स दिना” निमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन
“जागतिक एड्स दिना"निमित्त दि २ डिसेंबर २०२४ रोजी कृष्णा कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आयसीटीसी, बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व अचिव्हर्स कॉलेज, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने, कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ समीर सरवणकर, डॉ विनोद दौंड, यांच्या सहकार्याने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर एड्स रॅली बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण (प.) येथून सुरु होऊन पुष्पराज हॉटेल- शिवाजी चौक- सहजानंद चौक- संतोषी माता मंदिर रोड मार्गे —अचिव्हर्स कॉलेज, कल्याण (प.) येथे रॅलीची सांगता झाली.
या रॅलीत सुमारे २५० एन. एस. एस. रेड रिबन चे युवक-युवती तसेच इतर स्टाफ मिळून एकूण ३०० व्यक्तींनी सहभाग नोंदवला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ.दीपा शुक्ला, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, अचिव्हर्स कॉलेजचे संचालक डॉ. महेश भिवंडीकर यांनी रॅली साठी हिरवा सिग्नल देऊन रॅलीचे उद्घाटन केले. या वेळी आरोग्य मुख्यालयाचे डॉ.समीर सरवणकर,
डॉ.विनोद दौंड तसेच आयसीटीसी विभाग इन्चार्ज डॉ.सुलक्षणा त्रिभुवन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू लवंगारे ,एआरटी विभाग तसेच रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आयसीटीसी विभाग व एआरटी विभाग कर्मचारी, शास्त्रीनगर हॉस्पिटल, कोळशेवाडी दवाखाना येथील समुपदेशक व कर्मचारी हजर होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील राजेश यादव, नेहा त्रिपाठी, प्रतिमा विश्वकर्मा, अचीव्हर्स कॉलेज, डॉ. संदेश जायभाये, बिर्ला कॉलेज व रासेयो विभागीय समन्वयक, रितिक गुप्ता, मुथा कॉलेज, डॉ. अतुल पांडे, सोनवणे कॉलेज डॉ. दिलीप सिंग, शशिकांत तिवारी, श्रुती पाटील, एम के कॉलेज, रवी शेडगे, मॉडेल कॉलेज, प्रणित कासारे बी. के. बिर्ला रात्र कॉलेज, महाराष्ट्र युवा संघाचे अजित कारभारी, साकेत कॉलेज व प्रगती कॉलेज चे प्राध्यापक तसेच एनएसएसच्या युवक - युवतींनी आपला सहभाग नोंदवला. सदर रॅलीसाठी वायआरजी संस्था, एनटीपी प्लस संस्था यांचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला कृष्णा कुमावत यांनी जागतिक एडस् दिना बाबत माहिती दिली तसेच जागतिक एड्स दिनाची प्रस्तावना सांगून सर्वांनी एड्स विषयी शपथ घेतली. डॉ. दीपा शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना एड्स बाबत माहिती दिली. डॉ. महेश भिवंडीकर यांनी एड्स बाबत संबंधीतांना मोलाचे मार्गदर्शन केले. अचिव्हर्स कॉलेजच्या एनएसएसच्या
विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजित कारभारी सर व प्रा. राजेश यादव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा त्रिपाठी यांनी केले.