स्व.धनराज नहार स्मृती व्याख्यानमालांचे शिरूरला आयोजन
शिरूर :- श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिरूर येथे शनिवार दि.१५ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत स्व.धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा.चंद्रकांत धापटे सर यांनी ही माहिती दिली.
स्व.धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचे हे २८ वे वर्ष असून दररोज सायंकाळी पावणेसात वाजता शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालयात या व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.१५ फेब्रुवारीला माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचे न्यायव्यवस्था : सद्य;स्थिती आणि आव्हाने या विषयावर, रविवार दि.१६ फेब्रुवारीला सायबर मैत्र मुक्त पत्रकार, लेखिका मुक्ता चैतन्य यांचे आधुनिक जगण्याची डिजिटल आव्हाने - मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ? या विषयावर, सोमवार दि.१७ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव महेश झगडे यांचे लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही: सांविधानिक जबाबदा-या आणि वास्तव या विषयावर, मंगळवार दि.१८ फेब्रुवारीला इतिहास संशोधक व्यवस्थापन आणि मार्गदर्शक डॉ.अजित आपटे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनशास्त्र या विषयावर, बुधवार दि.१९ फेब्रुवारीला लेखक अच्युत गोडबोले यांचे माझा लेखन प्रवास या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.