टिटवाळया मधील महिला उद्योजकांकरिता उद्योजिका महोत्सवा चे आयोजन.....
महिला उद्योजकां साठी आशेचा किरण..
टिटवाळा -
टिटवाळा आणि स्थानिक परिसरातील लहान, घरगुती महिला उद्योजकांना एक आरामदायी आणि मानक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, विविध घरगुती उत्पादन बाजारात आणण्यासाठी टिटवाळा मधील रिजन्सी क्लब हाऊस मध्ये छोटेखानी प्रदर्शन आयोजित केले आहे.सदर प्रदर्शन 22 आणि 23 मार्च रोजी उपलब्ध असणार आहे. उद्योजिका महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या माध्यमातून अनेक महिला भगिनीनी आपली उदयोजक म्हणून ची पाऊलवाट सुरु केली आहे.
या प्रदर्शनामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि विक्री करण्याचा फायदा होणार आहे . तसेच नवीन उदयोन्मुख स्टार्टअप्सना आत्मविश्वास मिळेणार आहे. या प्रदर्शनाच्या आयोजक मयुरी राजेश चौहान आणि रोहिणीश्री अनिल रंगारी स्वतः अनुक्रमे कपडे आणि भरतकाम सेवांचा यशस्वी व्यवसाय चालवत आहेत.
सदर प्रदर्शना मध्ये विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत. बेडशीट, एम्बरॉईडरी केलेले ब्लाउज पीस, सिल्क आणि कॉटन च्या साड्या, लेडीस कुर्ती, गृहसजावटीचे सामान, प्रमाणित आयुर्वेदिक उत्पादने, हस्तनिर्मित दागिने, घरगुती फराळ, केक, मातीच्या वस्तू, हस्तनिर्मित नेम प्लेट्स, विमा सल्लागार, हँड बॅग्ज, कोचिंग क्लासेस, बेकरी, टॅटू, किचन भांडी, पुजेचे सामान, मसाले, लहान मुलांचे खण कपडे, पापड कुरडई, घाणी तेल, फूड स्टॉल इत्यादींचे स्टॉल या प्रदर्शना मध्ये दिसून येणार आहेत.
तरी सर्व टिटवाळा नागरिकांनीं आणि विशेषत: महिला भगिनींनी आवर्जून प्रदर्शनीला भेट द्यावे, असं आवाहन प्रदर्शनाच्या आयोजक रोहिणीश्री रंगारी आणि सौ. मयुरी यांनी या निमित्ताने केले आहे.