• Total Visitor ( 84990 )

पालघरमध्ये चार दिवसांत 7 हजार 288 बाटल्या रक्त संकलन

Raju tapal October 12, 2021 36

पालघरमध्ये शिवसेनेने  आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी सलग चौथ्या दिवशी 1500 हून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. शुभारंभाच्या दिवशी, शुक्रवारी 2337, शनिवारी 1600, रविवारी 1850 आणि सोमवारी 1501 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आहे. अवघ्या चार दिवसांत 7 हजार 288 बाटल्या रक्त संकलन करण्यात यश आले. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोमवारी या महारक्तदान सप्ताहाला उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला आणि या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीचे औचित्य साधून ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषद, ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, जे. जे. महानगर ब्लड बँक आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्या सहकार्याने 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शुक्रवार, 8 ऑक्टोबर रोजी या महारक्तदान सप्ताहाचा शुभारंभ केला.

Share This

titwala-news

Advertisement