• Total Visitor ( 84851 )

पालकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये

Raju Tapal September 26, 2022 31

पालकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये ; पुणे शहर आयुक्तालयाकडून आवाहन
          मागील दोन दिवसांपासून सोशल मिडियावर काही विद्यार्थ्या़चे फोटो व्हायरल केले जात असून त्यांना शाळेतून पळवून ,अपहरण करून नेले आहे अशा अफवा पसरविल्या जात आहेत परंतू यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून अशा प्रकारची कोणतीही घटना पुणे शहरात घडलेली नाही.तरी पालकांनी अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन पुणे शहर आयुक्तालयाकडून करण्यात आलेले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पुणे शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासून लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याबाबत फेसबुक, व्हाट्सअँप,ऑडिओ ,व्हिडीओ क्लिप,फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे जणमाणसांत व विशेषत: पालकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पसरत आहे.
असा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधून घटनेबाबत शहानिशा करून घ्यावी असे आवाहन पुणे शहर पोलीसांतर्फे करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारची माहिती अथवा संदेश मिळाल्यास नागरिकांनी पूर्ण खात्री केल्याशिवाय ते प्रसारित करू नयेत. अशा प्रकारच्या खोट्या माहितीद्वारे अफवा पसरविणा-या नागरिकांविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share This

titwala-news

Advertisement