पाणीटंचाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तात्पुरती सोय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतू सत्ताधा-यांनी आता हे टँकरही बंद केले आहेत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली या गावाना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले.
विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे मृणालिनी वाणी, , सुरेश गुजर, बाबूराव चांदेरे, सागरराजे भोसले, संदीप तुपे, दिपक बेलदरे, आंदोलनास उपस्थित होते.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना यावेळी पाण्याचा प्रतिकात्मक टँकर भेट देण्यात आला