• Total Visitor ( 85044 )

पाटस टोलनाक्याजवळ मालवाहतूक टेम्पो व ट्रकच्या अपघातात टेम्पोचालक ठार

Raju Tapal December 12, 2021 31

पाटस टोलनाक्याजवळ मालवाहतूक टेम्पो व ट्रकच्या अपघातात टेम्पोचालक ठार

  

पुणे - सोलापूर महामार्गावरील पाटस ता.दौंड टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक टेम्पो व मालवाहतूक ट्रक या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात  टेम्पोचालक ठार झाल्याची घटना घडली.

सियाचरण पासवान वय - ४६ असे अपघातात ठार झालेल्या टेम्पोचालकाचे नाव असून अपघात ठार झालेल्या टेम्पोचालकाचा पत्ता समजू शकला नाही. 

सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या केळी वाहतूक टेम्पो व  पुण्याहून बारामतीच्या दिशेने महामार्ग ओलांडून जात असलेल्या मालवाहतूक ट्रक या दोन वाहनांची धडक होवून अपघाताची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा वाहनचालक गंभीर जखमी झाल्याने टेम्पोचालकाला पाटस टोलनाक्याच्या रूग्णवाहिकेतून दौंड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले . उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

Share This

titwala-news

Advertisement