पाठीमागून भरधाव वेगात येणा-या ट्रकने समोरील दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक महिला ठार झाली .या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.
सरिता रमेश पवार वय - ४० पवार वस्ती शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून अंकूश मोतीराम जाधव वय- २५ सुनंदा दशरथ वाघे वय -५० दोघेही रा.पवार वस्ती, शिरवळ ता.खंडाळा अशी अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत.
सातारा - पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या एस आकाराच्या वळणावर तीव्र उतारावर बुधवारी दि.१७ नोव्हेबरला रात्री झाला.
वाई तालुक्यातील वेळे वरून तिघेजण बुधवारी रात्री एम एच १२ डी आर २६९६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून मासेमारी करून शिरवळकडे येत असताना खंबाटकी घाटात पाठीमागून येणा-या एम एच ११ एल ३५९ या क्रमांकाच्या ट्रकने समोरील दुचाकीस उडवले.या दुचाकीवर तिघेजण होते.
सारिका पवार यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागेवरच मयत झाल्या. अंकूश जाधव, सुनंदा वाघे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक पांगारे अपघाताचा तसेच ट्रकच्या क्रमांकावरून अपघातातील ट्रकचा तपास करीत आहेत.