पिकअप ची समोरील एस टी बसला पाठीमागून धडक; दोघे जखमी
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- भरधाव पिकअप ने समोर चाललेल्या एस टी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिक चालक तसेच त्याचा सहकारी जखमी झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे बुधवार दि.२३ जुलैला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
पिकअप चालक संदेश गुप्ता वय -२२ वर्षे रा.शिनोली ता.आंबेगाव तसेच तुषार साबळे वय -२० फुलवले ता.आंबेगाव अशी अपघातातील जखमींची नावे असून या अपघातात पिकअपच्या पुढील भागाचे जास्त नुकसान झाल्याचे समजते.
या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार, मंचरहून एस टी बस क्रमांक एम एच १४ बी टी ४९९९ नारायणगावच्या दिशेने जात असताना एकलहरे येथे गतीरोधक पाहून एस टी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एस टी बस थांबली.यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एम एच ०६ ए जी ४३७७ या क्रमांकाच्या पिक अपने एस टी ला जोरात धडक दिली.
या अपघातात पिकअप चालक गुप्ता यांच्या दोन्ही पायाला व डोक्याला मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्याचे समजले.
रस्त्याने जाणा-या प्रवाशांनी प्रसंगावधान राखून पहारीच्या साहाय्याने केबिनमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.