पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरून विकणा-या टोळीला अटक ; चिखली पोलीसांची कामगिरी
पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली, पिंपरी, निगडी येथून दुचाकी चोरून बनावट कागदपत्रे बनवून खानदेश,मराठवाड्यात विक्री करणा-या ४ जणांच्या टोळीला चिखली पोलीसांनी अटक केली.
गोविंद मुलचंद सोलंकी वय - २५ चिंचवड पुणे, मुळगाव छाप्रा देवास मध्यप्रदेश, संदेश उर्फ संजय अंकुश जाधव वय २८ रा. गोकुळ हाऊसिंग सोसायटी मोरेवस्ती चिखली, सहाम अब्दूल शेख वय-२६ रा.ताम्हाणे वस्ती चिखली, आदिनाथ अशोक राजभोज वय -१९ अजंठानगर पाण्याच्या टाकीजवळ निगडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपींकडून १९ लाख २२ हजार रूपयांच्या ६१ दुचाक्या पोलीसांनी हस्तगत केल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर, सहाय्यक पोलीस फौजदार आनंद चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन सावंत, सुनील शिंदे, बाबा गर्जे, किसन वडेकर, चंद्रशेखर चोरगे, विश्वास नाणेकर, विपुल होले, गणेश टिळेकर, कबीर पिंजारी, नुतन कोंडे, संतोष सपकाळ यांनी ही कामगिरी केली.