पोहायला गेलेल्या तीन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू ;
Raju Tapal
October 20, 2021
38
पोहायला गेलेल्या तीन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू ; बीड जिल्ह्यातील घटना
वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये पोहायला गेलेल्या तीन तरूणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली.
ओंकार लक्ष्मण काळे वय -१६, शिव संतोष पिंगळे वय - १६ दोघेही रा.बीड ,तान्हाजी लिंबाजी आरवड वय १७ रा. सुरळेगाव ता.गेवराई अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
ओंकार काळे व शिव पिंगळे हे दोघेही पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
दुस-या घटनेत गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे पोहण्यासाठी गेलेला तान्हाजी आरबड या तरूणाचा गोदावरी नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला.
Share This