• Total Visitor ( 133456 )

युवकांच्या टोळीकडून पोलीस शिपाईची सर्रास हत्या

Raju tapal March 08, 2025 29

युवकांच्या टोळीकडून पोलीस शिपाईची सर्रास हत्या,
एक पोलीस शिपाई गंभीर जखमी

चंद्रपूर:-पठाणपुरा मार्गावरील भर वस्तीतील बियर बारमध्ये दोन पोलीस शिपाई व काही युवक यांच्यात शाब्दिक भांडण झाले. त्यानंतर पोलीस व युवक बार मधून बाहेर पडले. दोन्ही पोलीस शिपाई घराकडे परत येत असताना मागून युवकांची टोळी आली आणि गल्लीत दोन्ही पोलीस शिपाई यांना गाठून गुप्तीने सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात दिलीप चव्हाण (३६) या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला तर शिपाई समीर चाफले (३४) गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताचे सुमारास घडली. दरम्यान जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून सर्रास हत्या, खून, होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही घटना बघून आजूबाजूचे लोक धावले आणि दोन्ही पोलीस शिपाई यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषित केले तर चाफले याला डॉ. चेपुरवार यांच्या खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अति. पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक एकुरे घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी या हत्या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी वाढली आहे. हत्या, खून प्रमाण वाढले आहे. तेव्हा गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली आहे.त्यापैकी पोलीस शिपाई चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. चाफले गंभीर जखमी आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या प्रकरणी दाद महाल वॉर्ड येथील तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. यात आणखी काही युवकांचा समावेश आहे. ते फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

भर वस्तीत बियर बार

उत्पादन शुल्क विभागाने कुठलेही नियम न पाळता भर वस्तीत बियर बार, परमिट रूम याला परवानगी दिली आहे. पिंक पॅराडाईज या बारला देखील अशाच पद्धतीने परवानगी दिली गेली आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर देखील या बियर बारला मंजुरी मिळाली आहे. त्याचा परिणाम आता अशा घटनांमध्ये होत आहे.

दोन पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यापैकी पोलीस शिपाई चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. चाफले गंभीर जखमी आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या प्रकरणी दाद महाल वॉर्ड येथील तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. यात आणखी काही युवकांचा समावेश आहे. ते फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

तणावाचे वातावरण

पोलीस शिपाई याच्या हत्येमुळे जिल्हा रुग्णालय व शहर पोलीस ठाण्याच्या समोर रात्री मोठी गर्दी झाली होती. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. पोलीस शिपाई यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार युवकांच्या टोळीवर कारवाई करावी अशी मागणी समोर आली आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement