• Total Visitor ( 139842 )

पोलिसांची जळगावात मोठी कारवाई 

Raju tapal April 19, 2025 13

पोलिसांची जळगावात मोठी कारवाई 
मसाज पार्लरवर टाकला छापा अन चार महिलांची केली सुटका !

जळगाव :- शहरातील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात मसाज पार्लरच्या अनेक शॉप सुरु झाल्या असतांना आता शहरातील नयनतारा मार्केट मॉल येथे मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबीसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. एकूण चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ नयनतारा ऑर्किड मॉल येथे दुकान नंबर ४०८ मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय चालतो अशी माहिती एलसीबीला मिळाली होती.त्यांनी बनावट ग्राहक पाठवला. तिथे संशयित राजू मधुजी जाट (रा.कलोधिया ता. पिंपरी जि. भीलवाडा,राजस्थान) याने बनावट ग्राहकाला व्यतिरिक्त इतर सेवा देण्यासाठी आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये चार महिलांच्या मार्फत पाच सेंटरच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसले. त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी धानी (वय २० वर्ष रा. चत्तरगढ पत्ती जि. सिरसा, हरियाणा) हा व्यवसायाला प्रोत्साहन देत होता. म्हणून दोघांविरुद्ध पिटा ऍक्ट प्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मॅनेजर राजू जाट याला अटक करण्यात आली आहे. तर या महिलांना आशादीप महिला वस्तीगृहात पाठवण्यात आले आहे.

ही कारवाई ही जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, सपोनी शितल कुमार नाईक, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक निरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, उपनिरीक्षक वैशाली महाजन, हेडकॉन्स्टेबल प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दीपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement