• Total Visitor ( 391599 )
News photo

काष्टी गावाजवळ रस्त्याची दुरवस्था 

Raju tapal February 10, 2026 14

काष्टी गावाजवळ रस्त्याची दुरवस्था 

       

शिक्रापूर:- अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावाजवळ रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तांदळी हे गाव घोडनदी  काठावर वसलेले असून तांदळी - काष्टी गावाला जोडणारा घोडनदीवर पूल आहे. या पुलाजवळील काष्टी गावापासून अहिल्या नगर जिल्ह्याची, श्रीगोंदा तालुक्याची हद्द सुरू होते. तांदळी गावाजवळील घोडनदी पुलाजवळ पुणे जिल्ह्याची शिरूर तालुक्याची हद्द संपते. घोड नदी पुलापासून अहिल्या नगर जिल्ह्यात,श्रीगोंदा तालुक्यात प्रवेश करताच काष्टी गावाच्या सुरूवातीस वाहनचालकांचे,प्रवाशांचे खराब रस्त्याने स्वागत होत आहे. या रस्त्यावरून शिरूर तालुक्यातील न्हावरे‌,वडगाव रासाई,मांडवगण फराटा,तांदळी गावातील प्रवासी,वाहनचालक प्रवास करत असतात.

सध्या लग्नसराई असल्याने या रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. घोड नदी पुलापासून काष्टी 

गावापर्यंतचे अंतर अर्ध्या किलोमीटर पेक्षा कमी असून घोड नदी पुलापासून काष्टी गावापर्यंत डांबरीकरण करणे अतिशय गरजेचे आहे.

प्रतिनिधी:- विजय ढमढेरे


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement