दिवाळी फराळ परदेशात पाठविण्यासाठी पोस्ट आॅफीस सज्ज
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- परदेशातील नातेवाईकांना दिवाळी फराळाचा आनंद घेता यावा यासाठी टपाल विभाग सज्ज झाला असून फराळ पोहोचविण्यासाठी टपाल विभागाची यंत्रणा सुरू झाली आहे अशी माहिती पर्वती, पुणे येथील पोस्ट कर्मचारी संजय बाजीराव गायकवाड यांनी दिली.
पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात आहेत.
नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत.
परदेशात असलेल्या नातेवाईकांना दिवाळीचे औचित्य साधून फराळ पाठविण्याचे काम पोस्ट कार्यालयाच्या वतीने करण्यात येत असून त्यानूसार तयारी पूर्ण झाली आहे.
पुणे शहरातील पुणे एच ओ,सिटी पोस्ट आॅफीस पुणे,चिंचवड ईस्ट,मार्केट यार्ड,पर्वती आणि इतर ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टपाल कार्यालयाच्या वतीने आॅस्ट्रेलिया,कॅनडा,जर्मनी,यु के,इंग्लंड,चीन,यु ए ई,रशिया आदी ठिकाणी दिवाळीचा फराळ नाममात्र किंमतीत पॅकिंग करून माफक दरात पाठविण्याची सुविधा टपाल कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे असे पर्वती,पुणे येथील पोस्ट कर्मचारी संजय बाजीराव गायकवाड यांनी "टिटवाळा न्यूज" ला सांगितले.