पोटच्या मुलाकडून जन्मदात्या बापाची फाशी देवून हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील परळी शहरात घडली.
अजय शांतीलाल लुंकड असे हत्या झालेल्या पित्याचे नाव असून सिद्धार्थ अजय लुंकड असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलीसांनी आरोपी सिद्धार्थला अटक केली आहे.
परळी शहरातील विद्यानगर भागात राहाणा-या अजय शांतीलाल लुंकड या प्लॉट व्यावसायिकाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती अगोदर पोलीसांना देण्यात आली होती.
त्यानंतर आरोपी मुलाचे संशयास्पद वर्तन आणि शवविच्छेदनाच्या अहवालाच्या जोरावर पोलीसांनी या गुन्ह्याची उकल केली.
आरोपी मुलाने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. वडिलांचे माझ्यावर प्रेम नव्हते म्हणून हत्या केली असे आरोपी सिद्धार्थने पोलीसांना सांगितले आहे. हत्येच्या ७ दिवसानंतर पोलीसांनी आरोपी मुलाला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी पत्रकारांना दिली.