प्रेयसीचा खून करून लोणावळ्यात आलेल्या प्रियकराला शहर पोलीसांकडून अटक
Raju Tapal
November 11, 2021
82
प्रेयसीचे कोणाबरोबर तरी प्रेमसंबंधा असल्याच्या संशयावरून तिचा खून करून औरंगाबादवरून लोणावळ्यात आलेल्या प्रियकराला लोणावळा शहर पोलीसांनी जेरबंद केले.
भोलाकुमार वय -२७ रा. मूळ रा.गोरखपूर उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भोलाकुमार याचे मृत तरूणी इंदू बरखू राय -२२ रा.मुकूंदनगर रामकाठी औरंगाबाद हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. भोलाकुमार हा तरूणीच्या वडिलांच्या सोबत प्लंबिंगचे काम करत होता. मागील दीड वर्षांपासून त्यांच्याच घरी राहाण्यास होता. यादरम्यान त्याचे आणि इंदू हिचे सूत जुळले. इंदू हिच्या घरच्यांना समजल्यावर भोलाकुमार याला इतरत्र बाहेर राहाण्यास इंदू हिचा मोठा भाऊ सुनिलने सांगितले. त्यानंतर ८ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता इंदू नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली.
मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. तिच्या घरच्यांनी भोलाकुमार याच्याशी संपर्क साधला असता त्यानेही त्यांच्यासोबत इंदूचा शोध घेण्यास सुरूवात केली.
दुस-या दिवशी सकाळी इंदू हिच्या घरच्यांना समजले की औरंगाबाद येथील राजनगर भागातील एका मोकळ्या मैदानात एक युवती बेशुद्धावस्थेत पडली आहे. त्यांनी तिथे जावून पाहिले असता इंदू असल्याचे लक्षात आले. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भोलाकुमार याला फोन केला असता त्याचा फोन लागत नसल्याने त्यांना त्याचा संशय आला.
त्यांनी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
पोलिसांनी त्याचा माग काढला असता तो लोणावळ्यात पळून जात असल्याचे त्यांना समजल्याने लोणावळा पोलीसांना माहिती दिली.
लोणावळ्यातील सेटर पॉईंट याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपी भोलाकुमार याला अटक केली.
Share This