प-हाडवाडी ता.शिरूर येथे ३५ वर्षीय तरूणाचा खून
शिरूर तालुक्यातील केंदूरजवळील प-हाडवाडी येथे ३५ वर्षीय तरूणाचा डोक्यात मारहाण करून खुन करण्याची घटना घडली.
निलेश उर्फ पप्पू विष्णू प-हाड असे खून झालेल्या ३५ वर्षीय तरूणाचे नाव आहे.
मंगळवार दि.२१/१२/२०२१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधिक्षक राहूल धस शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामा केला.
आगोदर आरोपींना हजर करा तेव्हाच मृतदेह शवविच्छेदनाला देऊ अशी भूमिका निलेश उर्फ पप्पूच्या नातेवाईकांनी घेतली होती.
संबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेवून त्यास अटक केली जाईल अशी ग्वाही देवून नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
आरोपींच्या शोधार्थ दोन विशेष पथके रवाना करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.