खिशातच मोबाईलचा स्फोट होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू ,
Raju tapal
December 09, 2024
66
खिशातच मोबाईलचा स्फोट होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू ,
मोबाईलमुळे एका मुख्याध्यापकाला प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील सिरेगावबांध इथे घडली.
मुख्याध्यापकाने मोबाईल खिशात ठेवला होता . या स्फोटात मुख्याध्यापक गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे तर नत्थु गायकवाड असं जखमीचं नाव आहे.
सुरेश संग्रामे कुरखेडा तालुक्यातील कसारी जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते.
हे दोघेही एका कार्यक्रमासाठी जात असताना अचानक संग्रामे यांच्या खिशातल्या मोबाईलचा फोनचा स्फोट होऊन कपड्याला आग लागली.
त्या आगीत भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर बाईकवर मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
सुरेश भिकाजी संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वडसा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
नत्थु यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश संग्रामे हे मुख्याध्यापक असून ते आणि त्यांच्या बहिणीचे पती नथू यांच्यासोबत साकोलीहून सानगडी गावाकडे जायला निघाले होते.
सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गाडी अर्जुनी मोरगाव हद्दीतील सेरेगावबांध इथ पोहचली असता त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. यात ते गाडीवरून कोसळले.
दोघांनाही साकोली इथं रुग्णालयात नेण्यात आलं. त्यात सुरेश यांना मृत घोषित करण्यात आलं तर त्यांचे नातेवाईक नथू यांच्यावर भंडाऱ्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत सुरेश यांच्या मृतदेहाची प्राथमिक चौकशी केली असता त्यांच्या डाव्या बाजूचा भाग जळालेला आढळून आलं. याच भागात शर्टच्या खिशात मोबाईल ठेवलेला होता आणि त्याच मोबाईलचा स्फोट झाला.
हा मोबाईल Nothing phone 1 नावाचा होता,
Share This