संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा शिरूरमध्ये निषेध
शिरूर :- मेणबत्ती मोर्चा काढून, हुतात्मा स्मारकाला पुष्पहार घालून विविध संस्था, संघटना कार्यकर्त्यांच्या वतीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली वाहून त्यांच्या हत्येचा निषेध शिरूर शहरात करण्यात आला.
सरपंच संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात जे कोण आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे , मारेक-यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या
सकल मराठा समाज, सर्वधर्मीय,सर्व पक्षीय, सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कॅण्डल ( मेणबत्ती ) मोर्चात सहभागी झाले होते.