• Total Visitor ( 431021 )
News photo

वाहतूक कोंडी खड्ड्यांच्या समस्यांबाबत शिक्रापूर येथे जनआंदोलन...

Raju tapal October 07, 2025 93

वाहतूक कोंडी, खड्ड्यांच्या समस्यांबाबत शिक्रापूर येथे जनआंदोलन



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- दररोज होणारी वाहतूक कोंडी,रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत‌ शिक्रापूर परिसरातील नागरिकांनी आक्रमक होवून शिक्रापूर येथील चाकण चौकात जन आंदोलन केले.

शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिक्रापूरचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे‌,माजी उपसरपंच मयूर करंजे, राजाभाऊ मांढरे,पिंपळे खालसा गावचे माजी उपसरपंच अशोकराव धुमाळ, शिक्रापूर गावचे ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे,त्रिनयन कळमकर, रामभाऊ सासवडे,अक्षय भुजबळ, रविंद्र भुजबळ,सतिश सासवडे, अंकूश घारे,मंगल सासवडे, कांतीलाल गवारे,निलेश थोरात,गौरव करंजे, शिवाजी मांढरे, भाऊसाहेब केवटे, काकासाहेब चव्हाण, पंढरीनाथ गायकवाड,अमर करंजे हे जन आंदोलनात सहभागी झाले होते.

राजाभाऊ मांढरे, रामभाऊ सासवडे, त्रिनयन कळमकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे दुरूस्त करावेत,विरूद्ध दिशेने येणारी वाहतूक पोलीसांनी बंद करावी, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात ,सर्व विभागांच्या पदाधिका-या़ंची पोलीसांच्या माध्यमातून बैठक बोलवावी अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्याकडे आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही आंदोलनावेळी उपस्थित राहिले नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

शिक्रापूरमधील वाहतूक कोंडीबाबत आपण स्वत; पाहणी केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला आहे.आठवडाभरात आंदोलकांसह सर्वांची बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत दिशा ठरविणार आहे असे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी आंदोलकांना यावेळी सांगितले.

ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर कृती समिती, शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या वतीने हे जनआंदोलन करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement