• Total Visitor ( 642597 )
News photo

दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरूर मध्ये महामोर्चा 

Raju Tapal publisher July 24, 2026 28

दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरूर मध्ये महामोर्चा 

       

शिरूर (प्रतिनिधी: विजय ढमढेरे) :- दिल्ली येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिरूर शहरात महामोर्चाचे  आयोजन करण्यात आले होते. बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येवून महामोर्चास  सुरूवात करण्यात आली.यानंतर पुणे -नगर महामार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. भारत माता की जय,वंदे मातरम्,एक से साथ बोलो हल्लाबोल,जोर जोर से बोले हल्लाबोल अशा आवेशपूर्ण घोषणा यावेळी देण्यात आल्या.

नीट परिक्षेमध्ये झालेल्या पेपरफुटी,विद्यार्थ्यांच्या आत्महत्या,,विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा यावेळी निषेध करण्यात आला. ही परिक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक,,विश्वासार्ह करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींची नैतिक जबाबदारी स्विकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येवून सामाजिक कार्यकर्ते,शास्त्रज्ञ सोनम वांगचूक,अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून दिल्लीतील शांततापूर्ण आंदोलन करणा-या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. माजी आमदार अशोक पवार,लोकजागृती संघटनेचे रविंद्र धनक,उपनगराध्यक्ष मितेश गादीया,डाॅ.स्वप्निल भालेकर,डाॅ.संतोष पोटे,डाॅ.सविता सोनवणे आदींसह विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्यासह विधी,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर महामोर्चात सहभागी झाले होते.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement