• Total Visitor ( 133540 )

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू

Raju Tapal November 15, 2021 34

त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यात उमटले. अमरावती, नांदेड, मालेगाव ,पुसद, कारंजा या भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत कलम १४४ नुसार निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पत्रकात दिली आहे.

अमरावती,नांदेड,  मालेगाव, पुसद,करंजा या भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात दि.१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला फेसबुक, व्हाट्स अँप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर जातीय तणाव निर्माण करणा-या गोष्टी पसरविता येणार नाही. 

आक्षेपार्ह पोस्ट व्हाट्सअँप किंवा फेसबुकवर आढळल्यास संबंधित व्यक्ती, ग्रुप ऍडमिनवर कारवाई केली जाईल त्याचबरोबर १४ ते २० नोव्हेंबर या काळात सभा, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही. या गोष्टींची सर्वांनी नोंद घेण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Share This

titwala-news

Advertisement