MENU
  • Total Visitor ( 136126 )

पुणे स्टेशन ते पारगाव नवीन पी एम पी बसमार्ग सुरू 

Raju Tapal October 22, 2021 39

पुणे स्टेशन ते पारगाव नवीन पी एम पी बसमार्ग सुरू 

               -------------------

पी एम पी एम एल कडून मार्ग क्रमांक १३७ पुणे स्टेशन ते पारगाव सालुमालूचे ता.दौंड हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला असून पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके, माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते या बससेवेचे पारगाव ता.दौंड येथे उद्घाटन करण्यात आले.

ढोल ताशाच्या गजरात ,जल्लोषात बसची  मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके, पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, माऊली शिंदे, पोपट ताकवणे, पी एम पी एम एल चे वाहतूक व्यवस्थापख दत्तात्रय झेंडे, पास विभाग प्रमुख विक्रम शितोळे, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर हे याप्रसंगी उपस्थित होते.

माजी आमदार पुणे जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यावेळी बोलताना म्हणाले, जेष्ठ नागरिक , विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध असणाऱ्या दैनिक व मासिक पासद्वारे पी एम पी एम एल च्या संपुर्ण संचलन क्षेत्रात कितीही फिरता येते. पेट्रोल ,डिझेलचे दर वाढल्याने पी एम पी एम एल च्या बसने प्रवास करा हे सांगण्याची आता गरज नाही.

आमदार निलेश लंके हे ख-या अर्थाने आरोग्य दूत आहेत. त्यांनी अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारून कोरोना रूग्णांची रात्रंदिवस प्रामाणिकपणे  सेवा केली.

आमदार निलेश लंके यावेळी बोलताना म्हणाले, पुणे स्टेशन ते पारगाव या बससेवेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले हे मी माझे भाग्य समजतो.आदरणीय शरश्चंद्रजी पवार आरोग्य मंदीर या नावाने कोविड सेंटर उभारून लोकांच्या मनातील कोरोनाबद्दलची  भीती काढण्याचे काम केले. ८० टक्के लोकांचा मृत्यू कोरोनाच्या भीतीमुळे झाला. योग्य व पौष्टीक आहार, करमणूकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करून कोविड सेंटरमधील रूग्णांच्या डोक्यातून कोरोना काढला.

Share This

titwala-news

Advertisement