पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग
पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम रस्त्यावर असलेल्या फर्निचर गोदामाला आज सोमवार दि.25 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 8 वाजूध 42 मिनिटांनी भीषण आग लागली.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न चालू होतै. आगीचे कारण समजू शकले नाही.
गंगाधाम रस्त्यावर आईमाता मंदिरापरिसरात श्री जी लाँन्सजवळ फर्निचर गोदाम आहे. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मोठा धूर येत असल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास मिळाली. गोदामात लाकडी फर्निचर तसेच वस्तू असल्याने आग भडकली. घटनास्थळी तातडीने 15 बंब तसेच टँकर दाखल झाले. आग आटोक्यात येत नसल्याने खाजगी टँकरने पाणी मागविण्यात आले. अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आगीत कोणीही जखमी झालेले नसून कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते.