पुण्यातील सांगवीत भरसकाळी गोळीबार ; सराईत गुन्हेगाराचा गोळीबारात मृत्यू
दत्तजयंतीचा कार्यक्रम सुरू असताना पुण्यातील सांगवी येथे भरसकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्यांनी केलेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार योगेश जगताप रा.पिंपळे गुरव ,सांगवी याचा मृत्यू झाला.
सांगवी येथील काटेपुरम चौकात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडला.
सांगवी येथील काटेपुरम चौकात दत्तजयंतीचा कार्यक्रम सुरू होता. योगेश जगताप हे मेड प्लस दुकानासमोर असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी जगतापवर ४ गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने योगेश जगताप खाली कोसळला.
योगेश जगतापला तातडीने औंध येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळावर पोलीसांना गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या.
हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.