पुणे शहरातील शिवसेना नेते बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
निखिल बाळासाहेब मालुसरे वय -२८ रा.कमल स्मृती गाडीखानामागे १०५३ शुक्रवार पेठ असे आत्महत्या केलेल्या शिवसेना नेत्याच्या मुलाचे नाव आहे.
पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार निखिल मालुसरे याने राहात्या घरी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केली.
त्यानंतर त्याला तातडीने के ई एम रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
या घटनेची खडक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.