कल्याण(संजय कांबळे)जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधित कुंटूबियांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी सुमारे ४२कोटी९०लक्ष९४हजार इतकी रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून देण्यात आली आहे त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी दसरा आंनदात साजरी होईल.
जुलै२०२१मध्ये राज्यात पुर,चक्रीवादळ आदी नैसर्गिक आपत्ती आली. यामध्ये जिवीतहानी बरोबरच, घरे, जनावरे, शेती, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन,दुकानदार, टपरीधारक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.ठाणे जिल्ह्यातील, ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड व शहापूर आदी तालुक्याला देखील जोरदार फटका बसला. अनेक ठिकाणचे नुकसान पंचनामे झाले असल्याने विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, आदीनी बाधित झालेल्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यामध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयराम मेहेर, सरचिटणीस राम सुरोशे, सेवादलचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष शेलार, विलास सोनवणे, आदीचा समावेश होता.
त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मृत जनावरे, पुर्णत/अंशत पडझड झालेली कच्ची घरे,पक्की घरे,झोपडी, गोठे,मत्स्य बोटी, व जाळ्यासाठी अर्थसहाय्य, मत्सयबीज, शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार, टपरीधारक,व कुक्कुटपालन, शेडच्या नुकसानीसाठी मदत,व इतर अनुदेय बाबीकरीता बांधितांना मदतीचे वाटप करण्याकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून विभागीय आयुक्त यांनी ठाणे जिल्ह्याकरीता एकूण ४२कोटी,९०लक्ष ९४हजार एवढा निधी वितरीत केला आहे.यामध्ये घरे,कपडे,भांडी, वस्तू यासाठी३५कोटी,४लाख ५५हजार, मृत जनावरे१०लाख ४३हजार,पुर्णत/अंशत३लक्ष२७हजार, शेतजमीन नुकसान,२२लाख,दुकानदार ६कोटी७२लाख७२हजार, टपरीधारक१५लाख,४०हजार कुक्कुटपालन३५हजार, याचा समावेश करण्यात आला आहे.
विविध लेखाशिर्षाखाली जिल्ह्यातील ८तालुक्यांंना सुमारे३५कोटी,४लाख ५५हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये ठाणे ५हजार रुपये, मिराभाईंदर, शुन्य, कल्याण १३कोटी,६१लक्ष,५हजार रुपये, भिवंडी ८कोटी८६लक्ष३०हजार, अंबरनाथ२कोटी२६लाख१५हजार, शहापूर३४लाख७०हजार, मुरबाड६९लाख४०हजार असे एकूण२५कोटी७७लाख६५हजार इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. मृत जनावरे१०लाख३१हजार यामध्ये भिंंवडी तालुक्याला सर्वाधिक म्हणजे८लक्ष१हजार तर सर्वात कमी शहापूर तालुक्याला केवळ६०हजार रुपये. वाढीव दराने३लाख२७हजार ऐवढे आहे.
पुर्णत/अंशतः पडझड झालेली कच्ची/पक्की घरे,झोपडी, गोठे साठी प्राप्त अनुदान२७लक्ष१५हजार रुपये यामध्ये वितरित केलेले१लक्ष०८हजार, कल्याण१लाख१हजार१००रुपये, भिवंडी१५लाख८७हजार९००,उल्हासनगर, शहापूर८लाख७१हजार५००रुपये, मुरबाड४६हजार ५०० इतके तर वाढीव दराने३५लक्ष७हजार ऐवढे वितरित करण्यात आले. शेतजमीन नुकसानसाठी२२लाख रुपये वितरित केले आहे. यामध्ये शहापूर तालुक्याकरीता ५ लक्ष तर मुरबाड साठी१७लाख रुपये देण्यात आले आहेत. दुकानदाराकरीता ६कोटी७२लाख७२हजार तर टपरीवाल्यासाठी१५लक्ष४०हजार आणि कुक्कुटपालन व शेडच्या नुकसानीसाठी३५हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. अशा प्रकारे सुमारे ४२कोटी९०लक्ष९४हजार रुपये अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिंवडी, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, मिराभाईंदर,आदी भागातील पुरग्रस्त नांगरीकांच्या जिवनात दिवाळी दसरा थोडेफार आंनदाचे क्षण घेऊन येईल यात शंका नाही.
*मा श्री राजेश नार्वेकर(जिल्हाधिकारी, ठाणे)"जिल्ह्यातील बाधित तालुक्यांंना मागणी प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. संबंधित तहसीलदांंराना अटी व शर्ती च्या अधीन राहून लाभार्थ्यांना मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(फोटो)