शिरूरमधील रास - दा़ंडिया,गरबा कार्यक्रम रद्द
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- पाथ फाई्ंडर फाऊंडेशन आणि ओरटेक्स डान्स अॅकॅडमी प्रस्तुत शिरूर मध्ये आयोजित केलेला रास- दांडिया, गरबा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे
दि.२७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत शिरूर शहरातील सी टी बोरा काॅलेज रोडवरील साई गार्डन मंगल कार्यालय आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने, पावसामुळे तसेच माता-भगिनींच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला असून हा कार्यक्रम त्याच ठिकाणी शिरूर मधील साई गार्डन मंगल कार्यालय आवारातच दि.४ व ५ आॅक्टोबर २०२५ ला घेण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक मनसे जनहित विधी कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष,पाथफाईंडर फाऊंडेशनचे अध्यक्ष ,अॅड.स्वप्निलभैय्या माळवे यांनी कळविले.