• Total Visitor ( 133277 )

राजधानीत झळकली पत्रकार संघाची दैनंदिनी

Raju Tapal March 28, 2023 71

राजधानीत झळकली पत्रकार संघाची दैनंदिनी

नई दिल्ली :_  महाराष्ट्र राज्य म. पत्रकार संघ मुंबई ची दिनदर्शिका 2023 नुकतीच राजधानीत पोहोचली. 

महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ(मुंबई) ची 2023 ची दैंनदिनी नुकतीच वाटप झाली. मागील अनेक वर्षांपासून अध्यक्ष वसंत मुंढे, राज्य संघटक संजय भोकरे महासचिव डॉ विश्वास आरोटे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव नवी दिल्ली संपर्क प्रमुख रघुनाथ सोनवणे यांच्च्या नेतृत्वाखालील संघाच्या कार्यकारिणीने दरवर्षी माहितीपूर्ण संकलनाची दैनंदिनी काढत वर्षभर दुष्काळ,कोविड,अपघात,शेतकरी आत्महत्या,युवकांसाठी उद्योजकता प्रशिक्षण, निराधार कुटुंब व महिलांना मदत यासारखे  लोककल्याणाचे विविध उपक्रम राबवित आले आहेत. शासनाने या उपक्रमांची वेळोवेळी दखल घेत म.रा.पत्रकार संघाचे कौतुक ही केले आसून  संघाच्या लोकोपयोगी उपक्रमांची दखल घेत पत्रकार कल्याण निधीत चांगली वाढ दिली.
कोविड काळात पत्रकार संघाच्या वतीने --किराणा व इतर साहित्य वाटप झाले. तर एकल महिलांना दिपावली सणानिमित्त किराणा व साडी तसेच पत्रकारांना मदतीचा हात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली
संकटातील लोकांना मदत  म्हणजे लोकांच्या सुखदुखाशी नाते असलेला पत्रकारच राबवू शकतो. आणि याची ओळख महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ(मुंबई)ने वरील जनकल्याणाचे राबविलेले उपक्रम दाखवून देतात. अलीकडे पत्रकार व पत्रकारितेला अनेक अंगांनी टिकेचा धनी बनविले जात आहे. जेव्हा अशी उदाहरणे जगासमोर येतात तेव्हा मात्र पटते सर्व काही संपलेले नाही, सर्व काही उदासीन  नजारा नाही, तर पत्रकारितेतील माणूस अजून जीवंत आहे.

 दैनंदिनी 2023 यध्ये अनेक नवोदित अभ्यासू पत्रकारांचा संदर्भ अन्य लोकोपयोगी संकलीत माहिती असून ग्रामीण पत्रकारांचे हक्काचे विचारपीठ उपलब्ध झाल्याचे दिसते. शासन मान्यताप्राप्त अनेक पत्रकार संघ देशभरात काम करत आहेत परंतु महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कामाची तोड नाही. किंबहुना यातून अनेक संघटनांना प्रेरणा घेण्यासारखे आहे. 
सतत धावपळ करणारे अध्यक्ष वसंत मुंढे,  संघटक संजय भोकरे सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्च्या नेतृत्वाखालील संघाच्या कार्यकारिणीतील मान्यवरांनी पारंपारिक पत्रकार संघापासून दुर्लक्षित वर्गाला एक व्यापक प्रतिष्ठाण मंच मिळवून  दिला  याबद्दल आणि लोकहिताचे प्रेरक उपक्रम राबविल्याबद्दल पत्रकार संघाच्या कार्यकारिणीतील मान्यवरांचे आत्मीय अभिनंदन.

Share This

titwala-news

Advertisement