• Total Visitor ( 133680 )

*राजे संस्कार प्रतिष्ठान एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था* 

Raju tapal October 03, 2021 40

*राजे संस्कार प्रतिष्ठान एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था* 

     महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताच ठाण्यातील प्राध्यापक संभाजी शेळके यांच्या राजे संस्कार प्रतिष्ठान या संस्थेने २ ऑक्टोबर  गांधी जयंतीचे औचित्य साधून   सरळगाव येथील इंदिरावाडी याठिकाणी  मुलांनी आपली भविष्याची स्वप्ने रंगवावीत म्हणून लहान मुलांना चित्रकला वह्या आणि  रंगखडू  त्याचबरोबर कपडे खाऊ  महिलांना साड्या आणि थोडेसे धान्य    इत्यादी वस्तूंचे वाटप केले.

     ही संस्था गेल्या ३-४वर्षांपासून आदिवासी बांधव असतील गोरगरीब मुलं असतील तसेच अनाथ मुलं असतील यांच्या मदतीसाठी सतत आपल्याकडून काही ना काही मदत करत असते.मुलांच्या शैक्षणिक साहित्या पासून ते  जीवनावश्यक अन्नधान्याची मदत  या संस्थेने मुरबाड भागातील अनेक पाड्यांमध्ये ,आदिवासी वस्त्यांमध्ये केलेली आहे. खरचं या युगात ही संस्था जे कार्य करत आहे ते  कौतुकास्पद आहे.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा.संभाजी शेळके ,महेश शिराळकर, सरळगाव विभाग हायस्कूलचे  सहशिक्षक संजय इधे सर, नेवाळपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण भालके साहेब,  शिंगळे, सखाराम हिलम यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी आदिवासी बांधवांच्या व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दृश्य दिसून आले

Share This

titwala-news

Advertisement