• Total Visitor ( 133529 )

राजेंद्र जाधव यांना समाज भूषण पुरस्कारांनी सन्मानित

Raju Tapal December 05, 2021 45

राजेंद्र जाधव यांना समाज भूषण पुरस्कारांनी सन्मानित
  नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील राजेंद्र जाधव यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृति दिनानिमित्ताने माळी समाज सेवा समितीच्यावतीने दिला जाणारा यंदाचा पुरस्कार मनमाड शहरातील समाजसेवक राजेंद्र जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
         राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल जिल्हाध्यक्ष असली जाधव हे भुजबळ यांचे कट्टर निकटवर्तीय असून गेल्या अनेक वर्षापासून ते गोरगरीब जनतेला तसेच गरजूंना मदत करतात.
          मनमाड शहरामध्ये सर्वांच्या मदतीला  धावणाऱ्या नावामध्ये राजेंद्र जाधव यांचे नाव अग्रभागी घेतली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही सेवादलाचे जिल्हाध्यक्ष असून या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिर, क्रीडा स्पर्धांचे आयोजन यासह अनेक वेगवेगळे उपक्रम आशा जनतेची सेवा करतात.
         त्यांनी सर्व जाती धर्मीयांच्या मध्ये त्यांना आग्रहाची स्थान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 131 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सावता माळी समाज सेवा समितीतर्फे राजेंद्र जाधव यांचा स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन नाशिक येथे ओबीसी महामंडळ चे अध्यक्ष  डॉक्टर कैलास कमोद यांच्या हस्ते समाजसेवकांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement