रामलिंग महाराजांच्या पालखीची शिरूर शहरातून मिरवणूक
शिरूर :- शिरूर पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री.रामलिंग महाराजांच्या पालखीची महाशिवरात्रीनिमित्त २५ फेब्रुवारीला शिरूर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते मंगळवार दि.२५ फेब्रुवारीला दुपारी सव्वादोन वाजता आरती करण्यात आली.
पालखी मिरवणूकीत शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके, माजी आमदार अशोकबापू पवार , देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल ,युवा उद्योजक आदित्य धारिवाल आदी प्रमुखांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिरूर शहरातील नागरिकांसह परिसरातील गावांतील ग्रामस्थ मिरवणूकीत सहभागी झाले होते.
रामलिंग महाराज की जय असा जयघोष यावेळी करण्यात आला. पालखी सोहळा शिरूर शहराच्या मुख्य पेठेत आल्यानंतर नागरिकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. पालखीच्या दर्शनासाठी पाच कंदील चौकात महिलांची मोठी गर्दी झाली होती.
पालखी मिरवणूकीत सहभागी झालेल्या अंबड ,जालना येथील येथील सरस्वती ब्रास बॅण्ड ,मावळ येथील लेझीम व झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.पालखी मार्गावर सर्वत्र पताका लावण्यात आल्या होत्या.स्वागत कमानीही उभारण्यात आल्या होत्या.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )