दरवर्षी प्रमाणे आदिवासी पाड्यात दि १० नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळी फराळ वाटप करण्यात आले त्याचबरोबर यावर्षी आदिवासी पाड्यात चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले त्यामध्ये आदिवासी पाड्यातील इयत्ता १ली ते१०वी यावर्गातील मुलांनी सहभाग घेतला होता.
चित्रकला स्पर्धेत तीन गट होते पहिला गट इयत्ता १ ली ते ४ थी विषय निसर्ग चित्र,दुसरा गट ५ वी ते ७ वी विषय किल्ले / गड , तिसरा गट ८ वी ते १० वी विषय कोरोना जन जागृती या विषयांना अनुसरून यामुलांनी सहभाग घेतला होता. हि स्पर्धा आदिवासी भागातील चिंचवली गाव, कासगाव वाडी आणि कोपऱ्याची वाडी या गावांमध्ये ठेवण्यात आली. तिन्ही गावातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
त्या स्पर्थेत तीन गट प्रमाणे तीन विजेत्यांना बक्षीस देण्यात व उपविजेत्यांना ही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
कोपऱ्याची वाडी आदिवासी पाड्यातील महिला व मुलींसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती .त्यामध्ये २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये तीन विजेते व उपविजेत्यांना बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच ऐरोली, रबाळे, तळवली विभागामध्ये दि 03 नोव्हेंबर, 2021 रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, व दि 05 नोव्हेंबर, 2021 रोजी रांगोली स्पर्धा घेण्यात आली.
या उपक्रमच्या वेळी उपस्थिती संस्थेचे संस्थापक श्री प्रकाश बाळाराम पाटील , समाज सेविका सौ.वैशाली मनोहर मढवी , समाज सेवक श्री. रमेश लहू पाटील, उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण सागरनाथ मढवी, समाजसेवक श्री शंकर वारघडा संस्थेचे कार्यकरणी सभासद व कोपऱ्याची वाडीतील चिंचवली गाव, कासगाव प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला सर्वांचा चांगले सहकार्य लाभले, संस्थेतर्फे सर्वांचे मान्यवरांचे धन्यवाद.