कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती दिन उत्साहात साजरा !
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनी आज महापालिका उपसचिव किशोर शेळके यांनी महापालिका मुख्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सदर समयी उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.