राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने कामगार दिनानिमित्त १ मे २०२२ रोजी सणसवाडी ता.शिरूर येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सहसेक्रेटरी राजाराम शिंदे यांनी ही माहिती टिटवाळा न्यूजला दिली.
सणसवाडी येथील शिवम लॉन्स मंगल कार्यालयात सकाळी १० ते १ यावेळेत आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यास राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष ऍड . किशोर ढोकले, कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे , उपाध्यक्ष राजूअणा दरेकर, उपाध्यक्ष रमेश सातपुते, जनरल सेक्रेटरी अविनाश वाडेकर, खजिनदार गणेश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. असे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सहसेक्रेटरी राजाराम शिंदे यांनी सांगितले.